शिरूर : उद्या, मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी शिरूर शहरातून ग्रामदैवत श्री प्रभू रामलिंग महाराज यांच्या पालखी मिरवणुकीचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. ढोल पथक, झांज पथक, तसेच बँड पथकांच्या वादनाने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहे.
शिरूर शहरातून सुरू होणारी ही पालखी मिरवणूक रामलिंग गावाकडे मार्गस्थ होणार असून, शेकडो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. श्री प्रभू रामलिंग ट्रस्ट, शिरूर नगरपालिका प्रशासन, तसेच शिरूर पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे की, पालखी मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. टू-व्हीलर व फोर-व्हीलर मालकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करून प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात ही पालखी मिरवणूक पार पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्ट आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







No comments:
Post a Comment