सावधान ! एस.टी प्रवासात चोरट्यांचा सुळसुळाट - लाखोंचा ऐवज लंपास - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, February 27, 2025

सावधान ! एस.टी प्रवासात चोरट्यांचा सुळसुळाट - लाखोंचा ऐवज लंपास


शिरूर : शिरूर - चौफुला एस.टी.बस मध्ये प्रवास करत असलेल्या शोभा आत्माराम लोंढे (वय६०)राहणार वाडा कॉलनी शिरूर यांच्या बॅगेतील तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज आज्ञात चोरट्यांने लंपास केला.
ही घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० ते ३.४५ च्या दरम्यान घडली.बॅगेत सोन्या-चांदीचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम होती.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोभा आत्माराम लोंढे या केडगाव -चौफुला येथून शिरूर - चौफुला एसटी बस क्रमांक एम.एच ४० वाय ५८१४ ने प्रवास करत होत्या.
प्रवासादरम्यान त्यांनी आपली बॅग कंडक्टरच्या शेजारील सीट खाली ठेवली होती मात्र आज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत बॅग लांपास केली. बॅग चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ह.राऊत व सहा. पोलिस फौजदार साबळे करत आहेत.एस.टी बस ने प्रवास करत असताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा व सतर्क रहा असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here