न्हावरे येथे पुन्हा वाहन चोरी - पीकअप जीप वर चोरट्यांचा डल्ला - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 26, 2025

न्हावरे येथे पुन्हा वाहन चोरी - पीकअप जीप वर चोरट्यांचा डल्ला


न्हावरे : शिरूर तालुक्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून न्हावरे येथे एका पीकअप जीपची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे न्हावरे येथील मेहबूब हनिफ शेख यांच्या घरासमोरील उभी असलेली महिंद्रा पिकअप जीप ( MH 12 CT 6582 ), 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.41 वाजण्याच्या सुमारास आज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
या वाहनाची किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये असून लाकडी हौदा व त्याच्या केबिनच्या बाजूला हिरव्या रंगात 786 असा क्रमांक लिहिलेला आहे या घटनेबाबत मेहबूब हनीफ शेख यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौ.थेऊरकर व सहा.फौ.साबळे करत आहेत.  शिरूर तालुक्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काही दिवसापूर्वी परिसरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here