पत्रकारिता विद्यार्थ्यांचा प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया अभ्यास दौरा संपन्न - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, February 27, 2025

पत्रकारिता विद्यार्थ्यांचा प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया अभ्यास दौरा संपन्न


पारगाव प्रतिनिधी : नितिन गव्हाणे

पारगाव : भाई छन्नूसिंह चंदेले पत्रकारिता महाविद्यालयाच्या वतीने वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी दै. संचार, 95 MY FM आणि लोकप्रधान न्यूज चॅनेल यांना भेट देऊन माध्यम क्षेत्रातील विविध तांत्रिक आणि संपादकीय प्रक्रियांची माहिती घेतली.माध्यम संस्थांना दिल्या भेटी

अभ्यास दौऱ्याची सुरुवात भास्कर समूहाच्या 95 MY FM या रेडिओ केंद्राला भेट देऊन झाली. येथे सौरभ म्हामाने यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम रेकॉर्डिंग, संपादन आणि प्रसारण प्रक्रियेबद्दल सखोल माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दैनिक संचार या वृत्तपत्राच्या कार्यालयाला भेट दिली. येथे उपसंपादक प्रशांत जोशी यांनी पत्रकारिता क्षेत्रातील लेखनशैली, संपादन प्रक्रिया, मुद्रण तंत्रज्ञान आणि छपाईबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर लोकप्रधान न्यूज चॅनेल व डिजिटल मीडियाच्या कार्यालयाला भेट देण्यात आली. येथे मुख्य संपादक अयाज शेख आणि संपादक असलम शेख यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व सांगितले. त्यांनी सत्यावर आधारित पत्रकारिता करताना कशाप्रकारे धैर्याने आणि जबाबदारीने काम करावे, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.       

       

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या अभ्यास दौऱ्याचे आयोजन प्राध्यापक विजयकुमार लोंढे आणि प्रा. विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दौऱ्यात प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड, प्रा. मनिषा पाटील आणि इतर प्राध्यापकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी विविध माध्यम संस्थांमध्ये जाऊन माहिती घेतली.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि पत्रकारितेच्या व्यावहारिक अंगांची माहिती होण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यातील पत्रकारांसाठी हा दौरा अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला, असे मत महाविद्यालयाच्या संस्थापिका अध्यक्ष माजी महापौर नलिनी चंदेले यांनी व्यक्त केले.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here