पुणे : स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करून पसार झालेल्या आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या. तब्बल 48 तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर मध्यरात्री 1.20 वाजता त्याला अटक करण्यात आली. ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने शोध घेतल्यानंतरही तो सापडत नव्हता, मात्र एका गावकरी महिलेमुळे पोलिसांना मोठा धागा मिळाला आणि अटक शक्य झाली.
गुनाट गावात उसाच्या शेतात लपलेला गाडे काल रात्री एका घरात पाणी प्यायला गेला आणि त्याची धडपड सुरू झाली. त्या घरातील महिलेने प्रसंगावधान राखत तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. लगेचच पोलिसांनी गाडेला चारही बाजूंनी घेरलं. त्याच्या हालचालींवर ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवलं जात होतं. पोलिसांनी उद्घोषणा करत त्याला शरण येण्यास सांगितलं. अखेर कॅनॉलच्या खड्ड्यात लपलेला गाडे बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
अटक मोहिमेचा थरार आरोपी गुनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली. दिवसभर ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवली गेली, पण तो सापडला नाही.रात्री 11.45 वाजता तो पाणी प्यायला एका घरात गेला, त्यावेळी घरातील महिलेने पोलिसांना फोन केला.
पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने संपूर्ण परिसराला घेरलं.ड्रोनच्या माध्यमातून उद्घोषणा करत त्याला बाहेर येण्यास भाग पाडलं.कॅनॉलच्या खड्ड्यात लपलेला गाडे शेवटी बाहेर आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.मध्यरात्री 1.20 वाजता त्याला अटक करण्यात आली.गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे पोलिसांना मोठं यश मिळालं. आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून आज सकाळी 11 वाजता त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.







No comments:
Post a Comment