यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडू भारसकरे
नवरगाव (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) : दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा, नवरगाव येथे ग्रामसभा संपन्न झाली. या सभेत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत घरकुलांची माहिती, अटी व शर्ती यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच, निवड झालेल्या लाभार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना घरकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या ग्रामसभेस नवरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजताताई कुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मारेगावचे कर्मचारी मुनेश्वर (विस्तार अधिकारी),
ग्रामसेवक अनामिका उईके, उपसरपंच संतोष महाडुळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य शेशिकांत डवरे, सोनालिताई कावडे, राखीताई करलुके, शालिनीताई दारुण्डे, निलेश करलुके, सोनाली सोनुले, सिमाताई सोनुले, सुधीर शेंडे, प्रकाश रामपुरे, ज्योती करलुके, बावनक शेताई आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संजय चचाने सर यांनी केले. ग्रामस्थांच्या उत्तम प्रतिसादामुळे ग्रामसभा यशस्वीपणे पार पडली.








No comments:
Post a Comment