न्हावरे येथे एसएससी परीक्षार्थींचे आनंददायी स्वागत - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, February 22, 2025

न्हावरे येथे एसएससी परीक्षार्थींचे आनंददायी स्वागत


न्हावरे : ता. शिरूर (ता. २१) : श्री मल्लिकार्जुन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एसएससी बोर्ड परीक्षा केंद्रात परीक्षार्थींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन परीक्षेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या परीक्षा केंद्रातून ४९७ विद्यार्थी परीक्षा देत असून, सर्व परीक्षा प्रक्रिया शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडत असल्याची माहिती केंद्रसंचालक रामदास सानप यांनी दिली.

विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक मानसिंग कोरेकर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, प्राचार्य रामदास सानप, पर्यवेक्षक बाळासाहेब जाधव, शिवाजी कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी एचएससी परीक्षा केंद्राचे केंद्रसंचालक प्रा. राजकुमार जगताप, उपकेंद्र संचालक प्रा. एन. बी. मुल्ला, प्रा. संतोष शेळके, तसेच एसएससी परीक्षा केंद्राचे उपकेंद्र संचालक आर. यु. पवळ, दिनेश शेलार, संभाजी साळुंखे, प्रा. जालिंदर जाधव, प्रकाश इंगळे, पांडूरंग सरके, किशोर गुंड, धनंजय शितोळे, डॉ. दत्तात्रय कारंडे, विपूल राऊत, अनिता गायकवाड, सारिका कोरेकर, बिपीन राऊत, मोहीनी शितोळे आदी मान्यवरांनी परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या.

परीक्षा केंद्रात शांत, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरण राखण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या असून, परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांगदेव होलगुंडे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे आणि शुभेच्छांमुळे परीक्षार्थी उत्साही आणि आत्मविश्वासाने भरलेले दिसून आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here