पारनेर प्रतिनिधी : अरुण बेलकर
पारनेर : मंत्र्यांचे आचार विचार शुद्ध असले पाहिजे जीवन निष्कलंक असले पाहिजे मंत्र्यांवर जर आरोप झाले असतील तर जबाबदारी म्हणून मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे दिली पाहिजे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मशान डॉ. अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केले. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मंत्रीधनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात असतानाच अण्णा च्या विधानाचा जोडला जात आहे.
कृषी खात्यातील घोटाळा व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणाने धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. मंत्री मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मीक कराड यांच्यावरती मोक्का लावला गेल्याने भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आशातच अण्णांनी आरोप झालेल्या व दोषारोपसिद्ध झालेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिकदृष्ट्या अधिकार नाही त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका मांडली.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील तीस वर्षांपूर्वी खटला सुरू असलेल्या प्रकरणात शिक्षण सुनावली गेल्याने त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. जर मंत्री राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री व राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतला पाहिजे. असे मत व्यक्त केले आहे.







No comments:
Post a Comment