शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय – १२९ शेत रस्ते खुले
शिरूर : शिरूर तालुक्यातील शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या पुढाकाराने तब्बल १२९ शेत रस्ते खुले करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांची अडचण मिटली
डिंभा व चासकमान धरणामुळे शिरूर तालुक्यातील शेती बारमाही आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीची जमिनी कमी होत असून, शेत रस्त्यांवर वाद निर्माण होत होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वाहतूक करणे कठीण झाले होते. यामुळे अनेकांनी तहसीलदार कार्यालयात शेत रस्ता खुला करण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
तहसीलदारांचा पुढाकार – शेतकऱ्यांना दिलासा
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी १२९ शेत रस्ते खुल्या करून शेतकऱ्यांची मोठी अडचण सोडवली आहे. यामुळे शेतीमाल वाहतूक, शेती यांत्रिकीकरण आणि शेतकऱ्यांचे दैनंदिन शेतीकाम सुलभ झाले आहे. अजूनही अनेक अर्ज प्रलंबित असून, तहसीलदार कार्यालय यावर तातडीने कार्यवाही करत आहे.
शेत रस्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?
शेत रस्ता हा शेतकऱ्यांचा हक्क असून, तो मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयात भूमापन क्रमांकासह लेखी अर्ज करावा.
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याच्या या सकारात्मक निर्णयामुळे तालुक्यातील शेतकरी समाधानी असून, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांचे आभार मानले जात आहेत.







No comments:
Post a Comment