
यवतमाळ (बंडु भारसकरे ) : 9 मार्च: राळेगाव तालुक्यातील शिवरा येथील शेतकरी निश्चल बोभाटे यांच्या सिताफळ बागेला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना 8 मार्च रोजी
दुपारच्या सुमारास घडली. गोपालनगर शिवारातील सर्वे नं. 3/1 येथे असलेल्या 10 एकर बागेत आग लागल्याने अंदाजे 3000 सिताफळ झाडे जळून खाक झाली. तसेच, बागेतील ड्रिप सिस्टीम, पाईपलाइन आणि अन्य साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार मैत्रे, निवासी तहसीलदार नरेंद्रजी हलामे, तलाठी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहेत.





No comments:
Post a Comment