शिरूर पोलीस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, March 8, 2025

शिरूर पोलीस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


शिरूर : जागतिक महिला दिनानिमित्त शिरूर पोलीस स्टेशनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस अंमलदारांचा सन्मान करण्यात आला.

या निमित्ताने सर्व महिला पोलिस अंमलदारांना फेटे बांधून साडी भेट देण्यात आली. तसेच, महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देण्यासाठी शिरूर शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी महिला पोलिस अंमलदारांनी नागरिकांशी संवाद साधत महिला सबलीकरण व सशक्तीकरणाचे महत्त्व पटवून दिले.

या वेळी शिरूर पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनामुळे महिला दिनाचा उत्साह द्विगुणित झाला आणि महिलांच्या सन्मानासाठी पोलिस दल सदैव तत्पर असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here