बौद्धिक आकलन क्षमता श्रेणी परिक्षेत मा.बापूसाहेब गावडे विद्यालयाचे विद्यार्थी चमकले! - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, March 10, 2025

बौद्धिक आकलन क्षमता श्रेणी परिक्षेत मा.बापूसाहेब गावडे विद्यालयाचे विद्यार्थी चमकले!


टाकळी हाजी (शौकत मुजावर) : मिशन मृत्युजय महिला स्वसंरक्षण विभाग महाराष्ट्र तसेच मृत्युंजय फाई क्लब यांच्या सयुक्त विद्यमाने तळेगाव ढमढरे येथे संस्थापक अध्यक्ष मास्टर प्रमोदजी फुलसुंदर यांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून बौद्धिक आकलन क्षमता श्रेणी परिक्षा नुकतीच संपन्न झाली यामध्ये पुणे जिल्ह्यातून अनेक शाळा,विद्यालय यांनी सहभाग घेत आपले विद्यार्थी उतरवले होते.
टाकळी हाजी( शिरूर) येथील मा.बापुसाहेब गावडे विद्यालयातील मुलांच्या गटात(१) सोहम दत्तात्रय गावडे(२) सार्थक धोंडीभाऊ जाधव यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमाक तसेच मुलींच्या गटात तनिशा शौकत मुजावर, गायत्री धोंडीभाऊ जाधव,पूर्वी संतोष पोपळगट,श्रद्धा संदिप करकंडे,अलविरा जाकीर पटेल यांनी वेगवेगळ्या वजन गटात तसेच आकलन क्षमता बेल्ट श्रेणी परिक्षेत क्रमांक प्राप्त केले,जिल्हा परिषद प्राथ.शाळा उचाळे वस्ती तेजस प्रविण पोकळे लहान गटात प्रथम,जिल्हा परिषद प्राथ.शाळा मांडव ओहोळ वस्ती माहिन शौकत मुजावर लहान गटात प्रथम, एस.पी.गावडे इंग्लिश मेडियम स्कूल प्रांजल बाळू चादर प्रथम श्रेणीत यश संपादन करत बेल्ट श्रेणीत क्रमांक प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्याना विद्यालयाचे प्राचार्य आर.बी.गावडे तसेच अजीत गावडे सरांनचे मार्गदर्शन तसेच कराटे प्रशिक्षक/ नॅशनल पंच शौकत मुजावर यांनी प्रशिक्षण दिले, या यशस्वी विद्यार्थ्याना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे,सचिव राजेद्र गावडे,सहसचिव सुनिता ताई गावडे, हॉटेल विश्व पॅलेस उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष पै. तुकाराम उचाळे,युवा उद्योजक प्रशांत चोरे,बाळू चादर, प्रविण पोकळे,धोंडीभाऊ जाधव सह पालक,ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here