
पारनेर (अरुण बेलकर) : संगमनेर तालुक्यातील साकुर पठार आणि पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर (खडकवाडी पठार) हा भाग दुष्काळग्रस्त आहे. या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथे मोठी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) स्थापन करण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली.
मुंबई, पुणे आणि नाशिक या गोल्डन ट्रँगल मध्ये असलेल्या . संगमनेर-पारनेर परिसरात मोठी औद्योगिक वसाहत उभारल्यास दोन्ही तालुक्यांचा विकास वेगाने होईल, असे आमदार तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले.
राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या डावोस आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत 15 लाख 70 हजार कोटींचे करार विविध उद्योग समूहांसोबत केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नवीन उद्योग येणार असून त्याचा फायदा संगमनेर आणि पारनेर तालुक्यांना मिळायला हवा, असे तांबे म्हणाले.
संगमनेर आणि पारनेर – औद्योगिक वाढीसाठी योग्य परिसर
संगमनेर आणि पारनेर हे दुष्काळी तालुके असून त्यांना मुंबई-नाशिक-पुणे गोल्डन ट्रँगल, नाशिक-पुणे महामार्ग, नव्याने प्रस्तावित सुरत महामार्ग, नाशिक-पुणे रेल्वे, काकडी विमानतळ यांसारख्या वाहतूक सुविधा आहेत. याशिवाय, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर आणि संगमनेर तालुक्यातील साकुर पठार परिसरात एमआयडीसीसाठी हजारो एकर जमीन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.







No comments:
Post a Comment