
पुणे : गुन्हे शाखा युनिट ६ कडून वाघोली आणि लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू भट्ट्यांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात गावठी दारू आणि कच्चे रसायन जप्त करण्यात आले आहे.
दि. ६ मार्च २०२५ रोजी युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील रामदरा डोंगराच्या पायथ्याशी छापा टाकला. या कारवाईत मुकेश करमावत (वय ५०, रा. गणेशनगर, फुरसुंगी, पुणे) हा गावठी हातभट्टीद्वारे अवैध दारू तयार करत असल्याचे आढळले.
यावेळी ८,३५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ७५० लिटर गावठी दारू, १५,००० लिटर कच्चे रसायन आणि इतर साहित्य यांचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दि. ५ मार्च २०२५ रोजी युनिट ६ च्या पथकाने बोरकर वस्ती, भावडी, वाघोली येथेही कारवाई करत रीना पवन राजपूत या महिलेवर कारवाई केली. तिच्या ठिकाणी १,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ७० लिटर गावठी दारू आणि ४,००० लिटर कच्चे रसायन मिळून आले. तिच्याविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण व त्यांच्या पथकाने केली.
या पथकात सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे आणि किर्ती मांदळे यांनी सहभाग घेतला.








No comments:
Post a Comment