मलठण येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबात शोककळा - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 4, 2025

मलठण येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबात शोककळा

मलठण : शिरूर तालुक्यातील मलठण येथे १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तन्मय रामदास कदम (वय - १९ वर्षे, रा. मलठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

घटनेचा तपशील

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय हा २ मार्च रोजी रात्री गावातील वरातीत सहभागी होऊन परतल्यानंतर शेजारील खोलीत झोपण्यासाठी गेला. ३ मार्च रोजी दुपारी वडील रामदास कदम यांनी तन्मयला गोठ्यातील फॅन सुरू करण्यास सांगितले. मात्र, त्याने काही प्रतिसाद दिला नाही. 
यानंतर त्याचा भाऊ ऋषभ खोलीच्या दरवाज्याशी गेला. दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून आत डोकावले असता तन्मयने खोलीतील लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. ही बाब समजल्यानंतर कुटुंबाने दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले. मात्र, तोपर्यंत तन्मयने आपले जीवन संपवले होते.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.
ही दुर्दैवी घटना संपूर्ण गावासाठी हादरवून टाकणारी असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here