
दौंड (अविनाश लोंढे) : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर येथील पाटबंधारे वसाहत व परिसरातील स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि. २ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजता दौंड शहरातील तहसील कार्यालय जवळ असलेल्या पाटबंधारे वसाहत ( इरिगेशन कॉलनी) येथे
राबवण्यात आले होते. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांनी नियुक्त केलेले 'स्वच्छता दूत' डॉ.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली
होती यावेळी दौंड, केडगाव व श्रीगोंदा येथील २२१ सदस्यांनी पाटबंधारे वसाहत व आजूबाजूचा जवळपास पाच हजार स्क्वेअर मीटरचा परिसर स्वच्छ करीत दोन ट्रॅक्टर व टेम्पोच्या साह्याने ११ टन कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली
याबाबत पाटबंधारे उपअभियंता कार्यालय यांच्या वतीने संस्थेचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पाटबंधारे विभाग दौंड उपविभागीय अभियंता शंकर मारुती बनकर, वरिष्ठ लिपिक पोपट आटोळे, कनिष्ठ लिपिक अमोल कदम यांसह डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दौंड शहरामध्ये पाटबंधारे वसाहतीमध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, प्रतिष्ठानच्या दौंड, केडगाव व श्रीगोंदा येथील श्री सदस्यांनी सुमारे ११ टन कचरा संकलन करुन योग्य विल्हेवाट लावली. या स्वच्छते मोहिमेमुळे परीसर स्वच्छ झाले असून उपविभागीय अभियंता शंकर बनकर यांनी स्वच्छते मोहिमेबाबत प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.









No comments:
Post a Comment