यवत येथे अज्ञात हल्लेखोरांचा कहर – एका कुटुंबावर हल्ला, एक ठार तर तिघे गंभीर जखमी - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 5, 2025

यवत येथे अज्ञात हल्लेखोरांचा कहर – एका कुटुंबावर हल्ला, एक ठार तर तिघे गंभीर जखमी


दौंड  (अविनाश लोंढे) : यवत पोलीस ठाणे हद्दीतील यवत रेल्वे स्टेशनजवळील निलकंठेश्वर मंदिराच्या परिसरात एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. रात्री १०.४५ च्या सुमारास शशिकांत चव्हाण यांच्या घरात तीन अज्ञात व्यक्तींनी घुसून काठ्या 

आणि दगडांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुटुंबातील अविनाश शशिकांत चव्हाण (वय ३४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणात लूटमारीचा उद्देश होता की पूर्ववैमनस्यातून घातपात, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी श्वानपथक दाखल झाले असून, यवत पोलीस पुढील तपास करत आहेत. 

या हिंसक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here