काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई – ३.०८ लाखांचा गावठी दारू साठा नष्ट, आरोपी अटकेत - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 5, 2025

काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई – ३.०८ लाखांचा गावठी दारू साठा नष्ट, आरोपी अटकेत


पुणे (क्राइम रिपोर्ट) : काळेपडळ पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर मोठी कारवाई करत ३,०८,९००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच घटनास्थळी उभारलेले पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.
कारवाईचा तपशील:
दि. ४ मार्च २०२५ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार दाऊद सय्यद यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, स.नं. १३, आदर्शनगर, हांडेवाडी ट्रेड पार्कजवळ, उरुळी देवाची, पुणे येथे इसम अजित संतोष जयस्वाल (रा. काळेपडळ, हडपसर) हा गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करत असल्याची खबर मिळाली.
या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ४४ कॅनमधून १,५४० लिटर गावठी दारू जप्त केली. तसेच, दारू गाळण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा नाश करत पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले.
गुन्हा दाखल:
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५५/२०२५, भा.दं.वि. कलम १२३ आणि महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) (ड) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेटे करत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:
ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी पोलीस:
या मोहिमेत सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोफौ रमेश गरुड, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अमोल फडतरे, संजय देसाई, परशुराम पिसे, कांबळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, शाहिद शेख यांनी सक्रिय सहभाग घेतला. काळेपडळ पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीला मोठा धक्का बसला असून, पुढील तपास सुरू आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here