
सणसवाडी (रिजवान बागवान) : पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीसच सहा वर्षीय कैफ बागवान याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण करत कुटुंबाचे व समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.
रमजान हा मुस्लिम धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा व पवित्र महिना असून, यामध्ये उपवास (रोजा), नमाज पठण आणि दानधर्माद्वारे अल्लाहची इबादत केली जाते. लहान मुलेसुद्धा आपल्या घरातील मोठ्यांचे अनुकरण करून रोजा ठेवण्याचा प्रयत्न करतात.बार्शी येथील रहिवासी जनाब सत्तार बागवान यांचा चिमुकला कैफ बागवान याने यावर्षी आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला. त्याच्या या उत्कृष्ट उपक्रमाचे कौतुक करत कुटुंबीयांनी त्याला पुष्पहार घालून सन्मानित केले.कैफ बागवानच्या या विशेष दिवसानिमित्त त्याचे मामा व सामाजिक कार्यकर्ते इरफानभाई बागवान, वडील सत्तारभाई बागवान, युवा पत्रकार संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान, चुलते अनिस बागवान, इकबाल बागवान, कमरूद्दीन बागवान, मुख्तार बागवान, मौलाना खलील सहाब, गुड्डू बागवान, आयान बागवान आदींनी त्याला शुभेच्छा देत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.कैफ बागवानच्या या पहिल्या रोज्याने त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्या या कृतीने समाजात सकारात्मक संदेशही पोहोचला आहे.






No comments:
Post a Comment