भाकपचे दिग्रस तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न – काॅ. किशोर कदम यांची तालुका सचिवपदी पुनर्निवड - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, March 2, 2025

भाकपचे दिग्रस तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न – काॅ. किशोर कदम यांची तालुका सचिवपदी पुनर्निवड



दिग्रस यवतमाळ (बंडु भारसकरे) : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. जिल्हा सहसचिव काॅ. संजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काॅ. रामचंद्र गजभार यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.

अधिवेशनात संघटनवाढ, स्थानिक समस्या आणि भविष्यातील कृती कार्यक्रम यावर सखोल चर्चा करण्यात आली. यासोबतच जुने सभासदांचे नूतनीकरण तसेच नवीन सभासद नोंदणी देखील करण्यात आली.

नवीन तालुका काउंसिलची निवड

पुढील तीन वर्षांसाठी नऊ सदस्यीय तालुका काउंसिलची निवड करण्यात आली. यामध्ये –

  • तालुका सचिव: काॅ. किशोर कदम (पुनर्निवड)
  • सहसचिव: काॅ. अशोक पारधी, काॅ. शरद मासुळकर
  • शहर सचिव: काॅ. जाफरभाई
  • कोषाध्यक्ष: काॅ. लक्ष्मणराव खंडारे
  • किसान सभा तालुकाध्यक्ष: काॅ. प्रदीप नगराळे
  • काउंसिल सदस्य: काॅ. पी. जी. गावंडे, काॅ. किसनराव दोरखंडे, काॅ. इकबालभाई, काॅ. शंकर दोरखंडे

नवीन काउंसिलने पुढील तीन वर्षांसाठी संघटन मजबूत करण्यासाठी कृती कार्यक्रम आखला आणि तो अधिवेशनात मंजूर करण्यात आला.

कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील असंख्य प्रतिनिधी उपस्थित होते. संचालन काॅ. पी. जी. गावंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका सचिव काॅ. किशोर कदम यांनी मानले. 




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here