शिरूर : शिरूर तालुक्यात झालेल्या अपघात प्रकरणी शिरूर पोलिसांनी जलदगतीने तपास करत फरार आरोपीला अटक केली असून, अपघातात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास पूर्ण
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अंमलदार रविंद्र आव्हाड, अजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. याच्या आधारे आरोपी नितीन किसनराव गडाख (रा. धनगर गल्ली, नेवासा, जि. अहिल्यानगर) याची ओळख पटली.
शिरूर पोलिसांनी आरोपीला शोधून काढून अटक केली आहे. तसेच अपघातात वापरण्यात आलेले महिंद्रा बलेरो पिकअप (एमएच १७ सीव्ही ९३८३) जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई पोलीस पथकातील पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, नारायण जाधव, तसेच पोलीस अंमलदार अजय पाटील, रविंद्र आव्हाड, सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ आणि निखील रावडे यांनी केली. शिरूर पोलिसांच्या जलद तपासामुळे अवघ्या काही दिवसांत अपघाताचा गुन्हा उघडकीस आला असून, आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. या प्रभावी कामगिरीमुळे शिरूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.








No comments:
Post a Comment