अहिल्यानगर : नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्या प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने अशोक बापू पवार यांची अहिल्यानगर जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या राजकीय अनुभवाचा जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यप्रणालीस मोठा फायदा होणार आहे पक्ष विस्तार मजबूत करण्यासाठी अशोक पवार यांची नियुक्ती प्रभावी ठरेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात पक्ष अधिक सक्रीय व प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नव्या जबाबदारीसाठी त्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते,
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्त्वात नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








No comments:
Post a Comment