न्हावरे (ता. शिरूर) : गावात वाहन चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकत्याच घडलेल्या पीकअप जीप चोरीच्या घटनेनंतर पुन्हा एका ट्रॅक्टर चोरीची घटना समोर आली आहे.ही घटना 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. डॉक्टर निलेश प्रकाश कोरेकर यांच्या घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या निळ्या रंगाच्या न्यू हॉलंड ट्रॅक्टर (MH 12 GN 8212) आणि काकरपाळी अवजार असे एकूण दोन लाख रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
डॉ. कोरेकर यांनी याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.
गावात दिवसेंदिवस वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी आणि चोरट्यांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.







No comments:
Post a Comment