भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 5, 2025

भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू


शिक्रापुर : सणसवाडी येथे पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (४ मार्च) सायंकाळी चंद्रमा हॉटेलजवळ घडला.
गणेश साठे (वय ४३, रा. पाटीलवस्ती, सणसवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते रस्ता ओलांडत असताना (एमएच १४ एलयू ५१८९) क्रमांकाच्या कारने त्यांना जबर धडक दिली. या धडकेत ते कारच्या काचेवर आदळून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारदेखील दुभाजकावर धडकली.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतीचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर दुखापतीमुळे गणेश साठे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी बापू साठे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कारचालक सचिन कमलाकर चक्रनारायण (रा. डांगे चौक, थेरगाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव करत आहेत.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here