महाराष्ट्र पोलीस न्यूज वर्धापन दिनानिमित्त अतुल भैया कुंजीर यांना आदर्श युवा समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, March 7, 2025

महाराष्ट्र पोलीस न्यूज वर्धापन दिनानिमित्त अतुल भैया कुंजीर यांना आदर्श युवा समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.



पुणे :  ६ मार्च २०२५ महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर झालेल्या या समारंभात सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवा अध्यक्ष पै. अतुल भैया कुंजीर यांना ‘आदर्श युवा समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. समाजसेवा आणि युवकांसाठी प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल त्यांना हा गौरव देण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्री डॉ. स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब होते, तर उद्घाटन मा. कॅप्टन एन. एस. रंघावा यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (मुंबई) ॲड. धनराज वंजारी, मा. जीवन विठ्ठल धोत्रे (वर्किंग जर्नलिस्ट ऑफ इंडिया, दिल्ली सदस्य), वरिष्ठ तुरुंग अधिकारी मा. शंकर गुजर आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस न्यूज २४ चॅनेलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपादिका सौ. स्मिताताई बाबरे, उपसंपादक मा. रमेश मामा गणगे, डायरेक्टर मा. शुभांगी वाघमारे आणि मा. यश सप्रे (स्वराज्य रक्षक संस्था संस्थापक अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य कार्यक्रम मेमाने फर्म अ‍ॅग्रो टुरिझम, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे येथे संपन्न झाला.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here