बाभुळगाव येथे शालेय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, March 7, 2025

बाभुळगाव येथे शालेय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


बाभुळगाव / यवतमाळ (बंडु भारसकरे) : आजीबाई बनारसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभुळगाव (ता. बाभुळगाव) येथे राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शालेय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय बाभुळगावच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमा बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबवण्यात आले.

या शिबिरात किशोरवयीन मुलांना पोषण आहार, सिकल सेल आजार आणि हिमोग्लोबिनच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, महाविद्यालयातील एकूण १०३ विद्यार्थ्यांनी हिमोग्लोबिन आणि सिकल सेल चाचणी करून घेतली.

या कार्यक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन समुपदेशक पी. एन. वाकडे (आर. के. एस. के.) यांनी केले. तसेच वेदांत मस्के (प्रयोगशाळा विभाग) यांनी विशेष परिश्रम घेतले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मिलमिले आणि शिक्षकवृंद यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले.

ग्रामीण रुग्णालय बाभुळगावच्या वतीने किशोरवयीन मुलींनी आरोग्य तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभागात तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here