
शिरूर (क्राइम रिपोर्ट) : शिरूर तालुक्यातील इनामगाव वाळूजपट येथे जुन्या कौटुंबिक वादातून एका व्यक्तीवर हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नितीन दादा कुचेकर (वय 36, व्यवसाय - मजुरी, रा. इनामगाव वाळूजपट, ता. शिरूर, जि. पुणे) हे 22 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 ते 8 च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोर असताना त्यांचा भाऊ संतोष दादा कुचेकर याने जुन्या वादातून वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष कुचेकर याने घरासमोर पडलेल्या बांबूच्या काठीने मारहाण करत त्यांना जखमी केले.यावेळी शितल संतोष कुचेकर आणि गुणाबाई दादा कुचेकर यांनीही नितीन कुचेकर आणि त्यांच्या पत्नीला जबरदस्तीने ओढून खाली पाडले व शिवीगाळ केली, असा आरोप आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या नितीन कुचेकर यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर 3 मार्च 2025 रोजी रात्री 8:08 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 150/2025 नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खबाले करत आहेत.






No comments:
Post a Comment