अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा – ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे प्रत सुपूर्द - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, March 3, 2025

अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा – ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे प्रत सुपूर्द

 मुंबई : राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून, अजित पवार गटाचे नेते आणि महसूल मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत होती. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्यावर दबाव वाढला होता. अखेर ८२ दिवसांच्या राजकीय गोंधळानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.
मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची प्रत सुपूर्द

धनंजय मुंडे यांचे पीए राजीनाम्याची प्रत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

विरोधकांचा दबाव आणि ८२ दिवसांचा संघर्ष

संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार आंदोलन छेडले होते. या मुद्द्यावर सरकारही अडचणीत आले होते. काल दिवसभर बैठकींचे सत्र सुरू होते. अखेर सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

राजकीय समीकरणांवर काय परिणाम?

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का? विरोधक आता पुढे काय भूमिका घेणार? या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.





No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here