
पुणे : शहरातील मांजरी खुर्द येथे एका शेतातील गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर तयार केल्या जात असल्याची गोपनीय माहिती युनिट ६, गुन्हे शाखेला मिळाली होती. यानुसार, दि. ७ मार्च २०२५ रोजी युनिट ६ च्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर जप्त केले.
या कारवाईत १४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जीएमएस पावडर, १८०० किलो एसएमपी पावडर आणि ७१८ लिटर पामतेल असा एकूण ११.५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, उर्वरित पनीर त्वरित नष्ट करण्यात आले. जप्त केलेला इतर मुद्देमाल पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना खरेदी करताना सावधगिरी बाळगावी, तसेच भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.
ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त (अन्न) नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, अस्मिता गायकवाड, सुप्रिया जगताप, नमुना सहायक एल. डब्ल्यू. साळवे यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.







No comments:
Post a Comment