भवानी मंडपात तीन वर्षीय चिमुरड्याला टाकून पालक फरार; पोलिसांचा शोध सुरू - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, March 3, 2025

भवानी मंडपात तीन वर्षीय चिमुरड्याला टाकून पालक फरार; पोलिसांचा शोध सुरू

कोल्हापूर : शहरातील ऐतिहासिक भवानी मंडप येथे रविवारी (दि. २) सकाळी अवघ्या तीन वर्षांच्या मुलाला सोडून त्याचे पालक पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रडणाऱ्या चिमुरड्याला पाहून परिसरातील खेळणी विक्रेत्यांनी तत्काळ जुना राजवाडा पोलिसांना माहिती दिली.

सापडलेल्या मुलाने आपले नाव आरुष सचिन चौगुले आणि पत्ता पलूस (जि. सांगली) असल्याचे सांगितले. मात्र, तो घाबरलेला असल्याने त्याच्या माहितीबाबत स्पष्टता नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी काही काळ मुलाच्या नातेवाइकांची वाट पाहिली, मात्र कोणीही त्याला शोधण्यासाठी आले नाही. त्यानंतर त्याला खाऊ दिला आणि बाल कल्याण संकुलात दाखल केले. 

दरम्यान, मुलाच्या पालकांचा शोध सुरू असून, हरवलेल्या मुलाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here