पुणे : राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात विक्रमी ६४ लाख ८३ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असून, यामध्ये मागील सरासरीपेक्षा मोठी वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या पीक पेरणीच्या अंतिम अहवालानुसार, राज्यातील पाण्याची चांगली उपलब्धता आणि ऊसाच्या क्षेत्रात घट झाल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र वाढले आहे.
हरभरा पिकाखालील क्षेत्र २१ लाख ५२ हजार हेक्टरवरून २९ लाख हेक्टरवर पोहोचले असून, गहू आणि मका पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे. गव्हाचे आणि मक्याचे सरासरी क्षेत्र १७ लाख ५३ हजार हेक्टर असून, ज्वारीची पेरणी १५ लाख ४६ हजार हेक्टरवर पूर्ण झाली आहे.
राज्यातील एकूण रब्बी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत हरभरा ४५ टक्के म्हणजेच २९ लाख हेक्टरवर पेरला गेला आहे.
यंदा ऊसाखालील क्षेत्र घटल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना चांगली संधी मिळाली आहे. परिणामी उत्पादनातही भरीव वाढ होण्याची शक्यता आहे, असे पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितले.








No comments:
Post a Comment