सुखसागरनगर कात्रज येथील खेळाचे मैदान बंद; मनसेच्या वतीने आंदोलन - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, March 6, 2025

सुखसागरनगर कात्रज येथील खेळाचे मैदान बंद; मनसेच्या वतीने आंदोलन


पुणे ( गणेश महाडिक ) : सुखसागरनगर, कात्रज येथील के.एन.के. सोसायटी परिसरातील ह.भ.प. पुंडलिक विठ्ठल टिळेकर खेळाचे मैदान गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. मैदानाच्या देखभालीकडे पुणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मैदानात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, साफसफाई होत नसल्याने झाडे उगवली आहेत. तसेच सुरक्षारक्षक नसल्यामुळे मैदानाचा वापर खेळाडूंना करता येत नाही.
या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आवारात क्रिकेट खेळून आंदोलन करण्यात आले. मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. लवकरात लवकर मैदान सुरू न झाल्यास महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या केबिनसमोर क्रिकेट खेळण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी मनविसे पुणे अध्यक्ष महेश भोईबार, मनसे हडपसर सचिव गोरख इंगळे, संतोष वरे, खंडू चांदणे, शाखाध्यक्ष गणेश बाबर, कुलदीप यादव, नाना बाबर, समीर वेदपाठक आणि दीपक सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांनीही मैदानाच्या दुरुस्तीची मागणी करत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here