मुळा नदीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, March 7, 2025

मुळा नदीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू


पारनेर (अरुण बेलकर) : साकूरजवळील बिरेवाडी येथील एका शेतकऱ्याचा मुळा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ७ मार्च) दुपारी घडली. दिनकर सोनबा ढेंबरे (वय ५५, रा. बिरेवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

घटनेचा तपशील


दिनकर ढेंबरे हे काही कामानिमित्त मुळा नदीच्या किनारी गेले होते. बनाई देवी मंदिराजवळ असताना अचानक त्यांचा पाय घसरून ते नदीच्या पात्रात पडले. पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस कारवाई


घारगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर, दत्तू चौधरी आणि महादेव हांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

या घटनेची नोंद घारगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here