बाभुळगाव येथे सिकलसेल व हिमोग्लोबिन चाचणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, March 2, 2025

बाभुळगाव येथे सिकलसेल व हिमोग्लोबिन चाचणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बाभुळगाव (बंडु भारसकरे) : स्व. रा. जा. उपाख्य बाबासाहेब घारफळकर कनिष्ठ महाविद्यालय, घारफळ (ता. बाभुळगाव) येथे राष्ट्रीय किशोरवयीन आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत सिकलसेल व हिमोग्लोबिन चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात किशोरवयीन विद्यार्थ्यांना सिकलसेल आजार, पोषण आहार व हिमोग्लोबिनचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराचे मार्गदर्शन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. रमा बाजोरिया यांनी केले. समुपदेशक पी. एन. वाकडे (आर. के. एस. के.) यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रयोगशाळा विभागातील श्री. वेदांत मस्के यांनी तपासणी प्रक्रियेत मेहनत घेतली.

शिबिरात महाविद्यालयातील ११२ विद्यार्थ्यांनी सिकलसेल आणि हिमोग्लोबिन तपासणी करून घेतली. यावेळी प्राचार्य, शिक्षक वृंद आणि आरोग्य अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

याशिवाय, ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव यांच्या वतीने किशोरवयीन मुलींनी आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here