स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची गरज: प्रशासक बाळासाहेब गावडे - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, March 3, 2025

स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची गरज: प्रशासक बाळासाहेब गावडे

टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : सध्या महिला मुलीनवर होणारे अन्याय अत्याचार घडण्याचे प्रकार समाजात होताना दिसत आहेत. यावर उपाययोजना व्हावी म्हणून प्रशासन देखील अशा घटना रोखण्यास तत्पर आहे.शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी ग्रामपंचायत मार्फत गावातील स्व. आबासाहेब पाचंगे विद्यालयात असंख्य विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे शिकवण्याचा उपक्रम सुरू आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावागावात प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थीनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे काळाची गरज असुन ढोकसांगवी गावातील विद्यार्थीनींनच्या स्वसंरक्षणासाठी आम्ही स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरू केले असुन त्यांच्या कला गुणांना वाव 
मिळावा म्हणून सदैव प्रयत्न करू तसेच सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव ही थींम समोर ठेवून विविध उपक्रम राबविणार आसल्याचे पंचायत समिती शिरूरचे विस्तार अधिकारी तथा ढोकसांगवी ग्रामपंचायत प्रशासक बाळासाहेब गावडे यांनी सांगितले.
विद्यालयात विविध उपक्रम राबवत स्पर्धात्मक परिक्षांची तयारी स्वसंरक्षण प्रशिक्षणासारखे शासनाचे उपक्रम सदैव विद्यालयान राबविणार आसल्याचे प्राचार्य बी.सोनवणे यांनी सांगितले.
स्वसंरक्षण प्रशिक्षणास विद्यार्थ्याचा उत्सपूर्त प्रतिसाद असुन चित्रकला,वकृत्व स्पर्धा,निबधलेखन विविध उपक्रम प्रा.बी. सोनवणे तसेच यशदाचे मास्टर ट्रेनर/ कराटे नॅशनल पंच शौकत मुजावर सह सर्व विद्यालयीन शिक्षकांच्या मार्फत राबविले जात आहेत.या प्रशिक्षण वर्गास ग्रामस्थ,पालक यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात असुन विद्यमान ग्रामसेवक एस.फडतरे यांनी या उपक्रमास प्राधान्य दिल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here