
पुणे : शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई करत ८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण १.९० लाख रुपये किमतीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
दि. ३ मार्च २०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पोलीस अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना गुप्त माहिती मिळाली की, एक बालक चोरीच्या दुचाकीसह फिरत आहे. त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत त्याने पुणे शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
१) सिंहगड रोड पोलीस स्टेशन – ३ गुन्हे
२) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन – १ गुन्हा
३) पर्वती पोलीस स्टेशन – १ गुन्हा
४) फरासखाना पोलीस स्टेशन – २ गुन्हे
या कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे यांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे आणि पोलीस अंमलदार अमित गद्रे, अजित शिंदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, महेश पाटील, साईकुमार कारके, नारायण बनकर यांनी ही कारवाई केली.
या तपासामुळे वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागला असून, पुणे शहरात चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्याच्या दिशेने पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.







No comments:
Post a Comment