यवत ग्राम महसूल अधिकारी अर्जुन स्वामी यांनी शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी काढून घेण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, March 8, 2025

यवत ग्राम महसूल अधिकारी अर्जुन स्वामी यांनी शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी काढून घेण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन


 

यवत (अविनाश लोंढे) : शेतकऱ्यांना शेतीच्या विविध योजनाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी कृषिविषयक महत्वकांक्षी प्रकल्प ॲग्री स्टॅक अंतर्गत शेतकरी कार्ड शिबिराचे आयोजन आज शुक्रवार दि. 7 रोजी यवत बाजारपेठेत यवत व यवत स्टेशन तलाठी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले.
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे 

लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ‘ॲग्री स्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्र CSC सेंटर तसेच तलाठी कार्यालय येथे सुरु असून ॲग्री स्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. 
सदर शिबिराचे आयोजन यवत तलाठी कार्यालय ग्राममहसूल अधिकारी अर्जुन स्वामी  व यवत स्टेशन ग्राममहसूल अधिकारी सोनवणे मॅडम यांनी केले आणि यासाठी यवत ग्राममहसूल सहाय्यक सचिन जगताप व सीएससी केंद्र चालक  राहुल बिचकुले व अक्षय भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले.
शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ भविष्यात फार्मर आयडी च्या माध्यमातून देणार येणार असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी तलाठी कार्यालय, महा ई सेवा केंद्र अथवा सीएससी सेंटरच्या माध्यमातून काढून घ्यावे असे आवाहन यवत ग्राममहसूल अधिकारी अर्जुन स्वामी यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here