
पुणे : "बेटी बचाओ, बेटी पढाओ" या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि जागतिक महिला दिनानिमित्त, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीसांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत, परिमंडळ ५ च्या वतीने महिला पोलीस बाईक रॅली आयोजित करण्यात आली.
ही रॅली ८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथून सुरू होऊन एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे समाप्त झाली. परिमंडळ ५ मधील २३२ महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी ११६ मोटारसायकलींवर स्वार होऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीला प्रसिद्ध सिनेअभिनेते पुष्कर जोग, अभिनेत्री संगीता तरडे आणि प्राजक्ता गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या भव्य रॅलीद्वारे महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला आणि महिला पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव करण्यात आला.






No comments:
Post a Comment