उद्योग नगरी कारेगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, March 8, 2025

उद्योग नगरी कारेगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

एव्हरी डेनिसन कंपनी व रीड इंडिया संस्थेचा विशेष उपक्रम

शिरूर (रिजवान बागवान) : पुणे जिल्ह्यातील नामांकित रांजणगाव एम.आय.डी.सी परिसरातील कारेगाव येथे सार्वजनिक वाचनालय आणि संसाधन केंद्र एव्हरी डेनिसन कंपनी व संस्थेमार्फत सुरू आहे,संस्थेसाठी लागणारा आर्थिक निधी ’एवरी डेनिसन’ या कंपनीच्या सी.एस.आर फंडातून रिड इंडिया संस्थेमार्फत केला 

जातो.या संस्थेचे कारेगाव व कर्डेलवाडी या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय आणि संसाधन धन केंद्र सुरू केले आहे,या केंद्रांच्या समन्वयक पदी सुवर्णा रोहित नवले या आहेत.विविध सामाजिक कार्यक्रम  तसेच सर्व प्रशिक्षण व आयोजन रिड इंडिया  मार्फत केले जाते.संस्थेच्या डायरेक्टर गीता मल्होत्रा यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असल्याचे नवले यांनी सांगितले.मोफत प्रशिक्षण मिळाल्याने प्रत्येक घटकातील स्री सक्षम बनत असल्याचेही त्या म्हणाल्या.
८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कारेगाव सेंटरवर महिला दिन विविध मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पी.एस.आय सविता काळे होत्या.त्यांनी आपल्या भाषणातून महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी सखोल मार्गदर्शन 
केले तसेच महिलांच्या संरक्षणार्थ  पोलीस सदैव पाठीशी आहेत असे सांगून जागतिक महिला दिनाच्या उपस्थित सर्वच महिलांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी कारेगाव नगरीच्या विद्यमान सरपंच वृषालीताई प्रशांत गवारे डॉ.निकिता तळेकर,सामाजिक कार्यकर्त्या व पोलीस मित्र मीनाताई गवारे,डॉ. मीना सांभारकर यांनी उपस्थित महिला भगिनींना सखोल मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.वरील सर्व प्रमुख पाहुण्यांचा संस्थेमार्फत सन्मान करण्यात आला.
सेंटरच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.त्यामध्ये संगीत खुर्ची,ड्रॉइंग, निबंध लेखन,भाषण यांचा समावेश करण्यात आला होता.आमच्या सेंटरवर संगणक प्रशिक्षण,बालपण विकास,शुद्ध वाचन,शुद्ध लेखन,आरी वर्क,ब्युटी पार्लर,सर्व शिवणकाम मोफत शिकवले जाते,या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही महिला विद्यार्थ्यांना लाईफ स्किल,हेल्थ अवेअरनेस,पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट,वुमेन एम्पॉवरमेंट या प्रकारचे धडे घेऊन सर्वांगीण विकासाला हातभार लावला जातो,तसेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याचाही प्रामाणिक प्रयत्न करतो.तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व वाचन प्रेमींना मोफत पुस्तके व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सर्व पुस्तके उपलब्ध केली जातात.असे सेंटरच्या समन्वयक सुवर्णा रोहित नवले यांनी सांगितले तसेच उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले. याप्रसंगी सेंटर चे सर्व स्टाफ मेंबर व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here