
पारनेर (अरुण बेलकर) : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती निवडणूक कार्यक्रम बाजार समितीच्या कार्यालयात पार पडला खासदार निलेश लंके साहेब यांचे निष्ठावान
कार्यकर्ते किसनराव रासकर यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली किसनराव रासकर यांच्या सभापती निवडी सूचना माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी मांडली तर माजी उपसभापती बाप्पूसाहेब शिर्के यांनी त्यांच्या निवडीस अनुमोदन दिले उपसभापती पदासाठी किसन सुपेकर यांच्या निवडीची सूचना
अशोक कटारिया यांनी मांडले तर माजी सभापती गंगाराम शेठ बेलकर यांनी त्यास आमोदन दिले. सभापती व उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक कार्यक्रम अधिकारी सहाय्यक निबंध विकास जाधव साहेब यांनी निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
सभापती व उपसभापती निवड निवडीत ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. निवडीवेळी जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक सावंत माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे अनुपस्थित होते बाजार समिती निवडक कार्यक्रमात महाविकास आघाडी अबाधित राखण्यात लंके यांना यश आले..
निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विकास जाधव यांनी काम पाहिले तर मुख्य लिपिक आर एस चाबुकस्वार बाजार समितीचे सचिव सुरेश आघाव यांनी काम पाहिले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.








No comments:
Post a Comment