
बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेचे फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने जनतेत तीव्र संताप उसळला आहे. आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील व्हायरल फोटो पाहून अशोक शिंदे हे अत्यंत अस्वस्थ झाले होते. त्यांनी या घटनेबाबत गावातील मित्रांसोबत चर्चा केली होती. काही वेळाने, "घरी जाऊन येतो" असे सांगून ते घराकडे गेले. मात्र, त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले.
कुटुंबीय व गावकऱ्यांचा आक्रोशया घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी समाजाला आवाहन केले आहे की, "अशा प्रकारे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्यातील एक एक मावळा जर कमी होत असेल, तर ही लढाई लढायची कशी?"







No comments:
Post a Comment