सरपंच उपसरपंच तसेच इतर शासकीय घटक यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करून पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्ती अभियान , अग्री स्टॅक योजना अशा शासनाच्या विविध योजना प्रभावी राबविण्याचा प्रयत्न करणार - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, March 1, 2025

सरपंच उपसरपंच तसेच इतर शासकीय घटक यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करून पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्ती अभियान , अग्री स्टॅक योजना अशा शासनाच्या विविध योजना प्रभावी राबविण्याचा प्रयत्न करणार

वरवंड (गौरव दिवेकर) : दिनांक 27 रोजी तालुक्यातील आठ मंडल भागातील भागातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील  तंटामुक्त अध्यक्ष  मंडळाधिकारी ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक यांची  तालुकास्तरीय बैठक तहसील कार्यालय दौंड येथे आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीमध्ये शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याच्या शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा आढावा घेण्यात आला या बैठकीस मा.  जितेंद्र दुडी जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली  श्री नामदेव टिळेकर (महसूल )उपजिल्हाधिकारी पुणे यांनी स्वतः उपस्थित राहुन सर्व उपस्थियांना या योजनेचे महत्त्व व प्रगती बाबत नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या इतर ऑनलाईन सेवा  इ हक्क, ई फेरफार आणि ई पीक पाहणी या योजनांचाही आढावा घेउन मार्गदर्शन केले 
तदनंतर मा.मिनाज मुल्ला उपविभागीय अधिकारी दौंड यांनी दौंड तालुक्यात सर्व गावनिहाय ग्राम स्तरावर सरपंच ,उपसरपंच, मंडळ अधिकारी, तसेच इतर सर्व ग्रामस्तरीय शासकीय घटक म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी, ग्राम विकास अधिकारी तथा ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक तथा कृषी
सेवक,पोलीस पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक यांची ग्रामस्तरीय  समिती स्थापन करून पाणंद रस्ते मुक्ती अभियान  प्रभावीपणे राबवण्याबाबत सूचना करण्यात आल्या गाव पातळीवर वाद मिटवून अतिक्रमण युक्त रस्ते खुले करण्याचे आवाहन करण्यात आले 
या बैठकीत श्री अरुण शेलार तहसीलदार दौंड   यांनी शासनाच्या  इतर योजनांची माहिती दिली व ग्राम स्तरीय समितीचे महत्व सर्वांना पटवून दिले या बैठकीस प्रशांत काळे गटविकास अधिकारी दौंड ,श्री राहुल माने तालुका 
कृषी अधिकारी दौंड, डॉ.तुषार बोरकर महसूल नायब तहसीलदार दौंड श्री देविदास मिसाळ सहायक निबंधक दौंड व इतर तालुकास्तरीय सर्व प्रशासकीय प्रमुख तसेच सरपंच उपसपंच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here