प्राचार्या विमल झावरे यांना "नारी शक्ती" पुरस्कार बहाल! - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 16, 2025

प्राचार्या विमल झावरे यांना "नारी शक्ती" पुरस्कार बहाल!


 


टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : द युवा ग्रामीण पत्रकार संघामार्फत दर वर्षी सामाजिक,धार्मिक,क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना नारी शक्ति पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात कारेगाव येथील श्री. दामोदर नामदेव ताठे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनसाठी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यार्थीनींना शिक्षणासाठी प्रोत्साहान देणाऱ्या प्राचार्या श्रीमती विमल झावरे यांना शिरूर 

पोलीस स्टेशनचे चे पोलीस निरीक्षक मा.श्री संदेशजी केंजळे, घोडनदी बार वकील संघटना उपाध्यक्षा ॲड.वर्षा सोनकांबळे,द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.अन्सारजी शेख ,पुणे जिल्हा अध्यक्ष शकील मणियार यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,सामाजिक क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच बहुसंख्य महिला भगिनी,द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका  पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरसाट सर ,आभार प्रदर्शन बाळासाहेब कौठळे यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here