जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत मा. बापूसाहेब गावडे विद्यालयाचे वर्चस्व! - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत मा. बापूसाहेब गावडे विद्यालयाचे वर्चस्व!

 

टाकळी हाजी(शेख शौकत मुजावर) : शेवगाव अहिल्यानगर येथे नुकत्याच अखिल महाराष्ट्र हौशी मुष्टियुद्ध असोशियशनचे मान्यतेने व अहमदनगर हौशी मुष्टियुद्ध संघटनेने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले.  या स्पर्धैमध्ये अनेक विद्यालये, शाळा, कॉलेज मधील असंख्य खेळाडूंनी सहभाग नोदवत आपल्या शाळा,विद्यालय, महाविद्यालयांची गाजवली.

टाकळी हाजी शिरूर येथील मा. बापूसाहेब गावडे माध्यमिक उच्चमाध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपल्या वजनगटात आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवली.

यामध्ये उत्कृष्ठ बॉक्सर म्हणून तनिशा शौकत मुजावर तर बेस्ट परफॉरमन्ससाठी मिजबा शौकत मुजावर यांनी विजयश्री खेचून आणली.यामध्ये प्रज्योत बदेश  पोकळे सुवर्ण पदक,सोहम दतात्रय गावडे सुवर्ण पदक,अनुष्का गोसावी सुवर्ण पदक,सार्थक धोंडीबा गावडे रौप्य पदक, माहिन शौकत मुजावर यांनी  रौप्य पदक प्राप्त करत दुसऱ्या क्रमाकांचे पारितोषिक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.     मिजबा मुजावर, बेस्ट बॉक्सर, तनिशा मुजावर यांनी विजयश्री खेचून आणल्याबद्दल शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सर्वांना सन्मानित केले. इंडियन ॲमेच्यूअर बाॅक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष मदनजी कोठूळे,आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी मनोहर ताथवडकर,राष्ट्रीय   पंच विजय भिकुले,पंच राजेंद्र शिरोळे,फिरोज खान, प्रवीण कपाटे, बाॅक्सिंगचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व छत्रपती पुरस्कार विजेते गुंडिदास कांबळे यांनी स्पर्धेचे कामकाज पाहिले 
 बाॅक्सिंग स्पर्धेचे  आयोजक गुरुवर्य युसुफजी शेख,संचालक भरत देशमुख ,डॉ.निरज लांडे व सर्व सहकारी यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले. सर्व मान्यवरांनी व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे शेवगाव यांनी सर्व खेळाडूंना सन्मानित केले. विजयी विद्यार्थ्याना प्रशिक्षक शेख शौकत मुजावर यांनी प्रशिक्षण दिले.

या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद मा.सदस्या सुनिताताई गावडे, संचालक राजेद्रदादा गावडे, विद्यमान सरपंच अरुणा दामूशेठ घोडे, सर्व सदस्य ,मा.प्रा.आर बी गावडे, अजित गावडे,धोडिंबा जाधव, दत्तात्रय गावडे, विश्व पॅलेस उदयोग समुहाचे संस्थापक पै. तुकाराम उचाळे, प्रविण पोकळे, युवा उद्योजक प्रशांत चोरे सह चांडोह, वडनेर, म्हसे, गुनाट शाखा विद्यालय तसेच न्यु इग्लिश स्कुल कवठे येमाई येथील शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केले.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here