शिवसेना युवासेनेच्या पाठपुराव्याला यश; महामार्गावरील कॅमेरा व एम बी सी बी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

शिवसेना युवासेनेच्या पाठपुराव्याला यश; महामार्गावरील कॅमेरा व एम बी सी बी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात


 

दौंड (अविनाश लोंढे) : पुणे-सोलापूर महामार्गाच्या यवत हद्दीतील ग्रामस्थ व प्रवासी अनधिकृत पणे  महामार्ग ओलांडत होते त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. उड्डाणपुलाच्या दुभाजकामध्ये एम बी सी बी बसवण्याबाबत तसेच उड्डाणपुलावर कॅमेरा बसवणे बाबत युवासेना तालुका अध्यक्ष मा. शुभम माळवे यांनी दि. २०/०१/२०२५ रोजी मा. प्रकल्प 
संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण वारजे यांना लेखी निवेदन दिले होते. प्रशासनाने निवेदनाची दखल घेत महामार्गाच्या दुभाजकावर एम बी सी बी बसवण्याचे काम सुरू करून अंतिम टप्प्यात आहे तसेच उड्डाणपुलावर दोन्ही बाजुला सुसज्ज चित्रीकरण दिसेल असा 
कॅमेरा बसविण्यात आला आहे.एम बी सी बी बसवल्यामुळे प्रवाशांचे अनधिकृतपणे रस्ता ओलांडणे बंद झाले असून अपघातांना आळा बसला आहे. ग्रामस्थ व प्रवासी यांना महामार्ग ओलांडण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्याच्या संदर्भात प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे शुभम माळवे यांनी सांगितले.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here