यवतमाळ( बंडु भारसकरे) : मारेगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील अर्जुणी या आदिवासी बहुल गावात प्रधानमंत्री जनमन केंद्रीय योजने अंतर्गत बहुउद्देशीय केंद्राची इमारत मंजुर झाली आहे. मात्र सुरु असलेल्या या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सरपंच वंदना आत्राम यांनीप्रकल्प अधिकाऱ्यासह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्यकार्यकारी अभियंताकडे दिली आहे. अर्जुणी या आदिवासी बहुल ग्रामपंचायत हद्दी मध्ये सन 2024-25 या आर्थीक वर्षात 59 लाख 96 हजार 738रुपयाचा निधी, बहुउद्देशीय केंद्राचे इमारतसाठी मंजुर झाला आहे. मात्र मंजुर इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रका प्रमाणे करण्यात
आलेले नाही, असा आरोप तक्रारीतुन करण्यात आला असुन निकृष्ट बांधकामामुळे ही इमारत ढासळुन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या इमारतीचा पायाभरण मुरुमा ऐवजी दगडमातीने भरण्यात आला आहे. इमारतीसाठी कच्ची सिमेंट विट वापरण्यात आली असुन बांधकाम रेती किंवा सेंड क्रश ऐवजी चुरी, भुकटीचा वापर करण्यात आला आहे. बांधकामावर अत्यल्प पाणी मारण्यात आलेले आहे. या इमारतीवर स्लॅब टाकण्यात आला असून स्लॅब मध्ये सुध्दा रेती ऐवजी चुरी भुकटीचा वापर करण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम निकृष्ट होत असल्यामुळे इमारत बांधकाम थांबविण्यात यावे तसेच जे बांधकाम झालेले आहे ते बांधकाम पुर्ववत सुरु करावे अशा आशयाची मागणी अर्जुणीच्या सरपंच वंदना आत्राम यांचेसह सदस्य गुलाब आत्राम, लक्ष्मी आत्राम, ललीता राऊत, गोपाल खामनकर, यांनी लेखी निवेदनातुन केली आहे.





No comments:
Post a Comment