न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथे गुरुपौर्णिमा साजरी ! - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, July 10, 2025

न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथे गुरुपौर्णिमा साजरी !

टाकळी हाजी(शेख शौकत मुजावर) : शिरूर तालुक्यातील मलठण येथे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली.
जीवनाला योग्य वळण लावणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले . विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले.या कार्यक्रमास स्कूल कमिटी सदस्य सुदाम भाऊ गायकवाड तसेच युवा 

उद्योजक सागर दंडवते,माजी सरपंच रामा भाऊ गायकवाड तसेच उपक्रमशील आदर्श शिक्षिका सौ मालन गायकवाड यांनी देखील उपस्थित राहून सर्व गुरुवर्यांना  गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री आसवले मॅडम यांनी  सर्व विध्यार्थ्यांना या दिनाचे महत्त्व सांगितले तर पर्यवेक्षिका सौ संगीता टिकले मॅडम यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here