ग्रामीण खेळाडू केंद्रबिंदू मानून कार्य करणार :सतिश राजहंस - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 8, 2025

ग्रामीण खेळाडू केंद्रबिंदू मानून कार्य करणार :सतिश राजहंस

टाकळी हाजी(शेख शौकत मुजावर) : महाराष्ट्र ही संताची भूमी आनेक पारंपारिक खेळ या मातीत खेळले जातात. वर्षानुवर्षे बदल होत आसुन स्वसंरक्षणाचे खेळ प्रचलित होत चालले राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर खेळांना मान्यता मिळाल्याने या मातीतील खेळाडूनी महाराष्ट्र सह देशाचे नाव उंचावले आहे.
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूचे किक बॉक्सिंग खेळाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रशिक्षक गुरुवर्य सतिशजी राजहंस हे उत्तम उदाहरण नव्हे तर आदर्श डोळ्यासमोर असुन त्यांनी अनेक पदके देशासाठी जिंकलेली आहेत. ग्रामीण भागातील हा खेळाडू कराटे, किकबॉक्सिंग मध्ये हजारो खेळाडू घडवत त्यांना मार्गदर्शन करत मार्गदर्शक बनले. हे कार्य चालू आसतांना किक बॉक्सिंग स्पोर्टस असो. महाराष्ट्र अध्यक्ष उमदा खेळाडू आणि वकृत्वाने भुरळ टाकणारे निलेश शेलार यांच्या सहकार्याने नव्हे तर सोबतीने त्यांनी किकबॉक्सिंग खेळात आपली चमक दाखवली ती संघटन कौशल्य, शांत हसरा स्वभाव एखांदे काम हाती घेतले तर पुरनत्वाला न्यायची जिद्द या गुणामुळे ते किकबॉक्सिंग स्पोर्टस असो. पुणे जिल्हा अध्यक्ष पदी विराजमान झाले.
ग्रामीण खेळाडू माहिती आभावी मागे राहतो आणि अंगात उमेद असुनही काही खेळापासून वंचित राहतो हे ओळखून त्यांनी ग्रामीण भागावर नजर टाकत त्यांनी अनेक तालुकयातील ग्रामीण खेळाडूची फळी बनवत त्यांना सोबत घेत ग्रामीण पातळीवर या खेळाला पोहचवण्याचा चंग बांधला त्यांच्या सोबत शहरा अध्यक्ष रुपेश परदेशी ग्रामीणचे उपाध्यक्ष उमदा चुनचुनीत खेळाडू प्रतिक नेवसे त्यांची टिम पुढे सरसावली आणि चमत्कार होत अनेक ग्रामीण खेळाडू घडवण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार 

यांनी केलेले विधान किंकबॉक्सिंग खेळ राज्यातील ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांनवर पोहचवणार हे सत्यात उतरत आहे.गुरुवर्य सतीश राजहंस यांनी पुणे ग्रामीणची मजबुत फळी तयार करूण अनेक स्पर्धा यशस्वी पार पाडल्या असून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात आसतो या उक्तीप्रमाणे त्यांच्या पत्नी सौ. सारीका राजहंस या त्यांच्या खाद्याला खांदा लावून उभ्या आसतात .अनेक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या दोन 

कन्यारत्न शिवानी,श्रावणी या दोन वाघीणी नेहमीच त्यांची साथ देतात. दोघीही आंतरराष्ट्रीय रेफ्री आसुन अनेक स्पर्धानमध्ये त्यांनी पदके प्राप्त केलेली आहे.त्यांचा उद्देश फक्त ग्रामीण खेळाडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावा आणि किकबॉक्सिंग खेळाचा प्रचार प्रसार व्हावा खेळाडू त्यांचा केंद्रबिदू असून त्यांना घडवण्याचे स्वप्न ते उराशी बाळगून असुन सर्वतोपरी ते प्रयत्न करत आहेत.त्यांच्या प्रयत्नांना यश येत असून संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शाळा,विद्यालय,कॉलेज मध्ये किकबॉक्सिंग खेळाला पंसती मिळत असून शेकडो खेळाडू घडत आहेत.





No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here