नगर मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी खासदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, July 11, 2025

नगर मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी खासदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

                        
       ४वर्षात 3८८ जणांचा अपघाती मृत्यू
पारनेर (अरुण बेलकर) : नगर मनमाड रस्ता विळद घाट ते सावळीविहीर 75 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे यासाठी नगर दक्षिणचे खासदार  निलेश लंके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवार 11 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खासदार  निलेश लंके यांनी 2018 पासून या रस्त्याचे काम दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे . वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा तारखांवर तारखा दिल्या जातात मात्र सहा वर्षात प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. यापूर्वी देखील आपण या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण केले होते मात्र आश्वासन देऊन देखील कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. चार आमदार दोन खासदार यांच्या मतदार संघातून हा रस्ता जात असून देखील सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासन सरकार यांचे हे अपयश आहे. 
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 2018 पासून आज पर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर 388 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आहे. हॉस्पिटल मधील मृत्यूंची संख्या विचारात घेतली  तर ही संख्या हजारो मध्ये आहे. नगर मनमाड रस्त्याची दुरुस्ती सुरू करून रस्ता वाहतुकीसाठी लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे..
खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केल्यानंतर उपोषण स्थळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन उपोषण न करण्याची विनंती केली. पावसाळा सुरू झाल्याने कामास विलंब होत 
असल्याचे अधिकारी यांनी सांगितले, मात्र खासदार लंके यांनी अधिकाऱ्यांचे म्हणणे संयुक्तिक नसल्याचे सांगत पावसाळ्याच्या नावाखाली      प्रवाशांच्या जीवाशी सरकार व प्रशासन खेळत आहे. ही वेळ काढू पणाची   लक्षणे आहे. रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याशिवाय व रस्त्याचे        काम किती दिवसात पूर्ण केले जाईल याची लेखी हमी दिल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here