राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, July 7, 2025

राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न.

टाकळी हाजी( शेख शौकत ) : मुजावर किक बॉक्सिंग स्पोर्टस असो. महाराष्ट्र यांच्यामार्फत पुणे येथे  किक बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहान संपन्न झाली.
महाराष्ट्रातील शेकडो शाळा,कॉलेज, विद्यालयीन खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धात खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत "आब इंडिया खेलेंगा किकबॉक्सिंग" नवसंदेश देत राष्ट्रीय पातळी नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास तयार असून वाडया वस्त्यावरील ग्रामीण खेळाडूना मार्ग खुला झाला आहे.
राज्यस्तरीय स्पर्धा ही नियोजनबध्द, नियमानुसार पार पडल्या आसुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्याचे सचिव धीरज वाघमारे,वरिष्ठ उपाध्यक्ष सुर्यप्रकाश मुंडपात,अनिल मिरकर,रणजित कताडे,कृष्णा ढोबळे,स्पर्धा नियोजक सतीश राजहंस,सहसचिव शुभम मिश्रा,
सहसचिव विशाल सिंग,आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी, श्रीकांत पुजारी, राष्ट्रीय पंच शिवानी राजहंस,अनंत पंचकवडे,निनोष्का दियास तसेच सर्व पंचानी स्पर्धेचे काम उत्तमरित्या पाहिले.राष्ट्रीय स्पर्धेस महाराष्ट्र संघ पुर्णपणे तयार असून लवकरच संघ स्पर्धेला जाणार आहे,किकबॉक्सिंग स्पोर्टस असो.महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार यांनी सांगितले.
या स्पर्धेस यशस्वी करण्याकामी शहराअध्यक्ष रुपेश परदेशी,श्रावणी राजहंस,उपाध्यक्ष प्रतिक नेवसे  यानी करण्यास विशेष प्रयत्न केले.सर्व राज्य टिम,जिल्हा टिमचे अभिनंदन महाराष्ट्र किक बॉक्सिंग चेअरमन संतोष बारणे यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here